शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची आ. राजेश बकाने यांच्या कडून पाहणी

Sun 14-Sep-2025,03:15 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर

वर्धा:देवळी पुलगाव मतदार संघातील अल्लीपूर कानगाव मंडळात दि १२ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी व गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाल्या ओढ्यांना पूर आल्यामुळे गावागावात पिकांचे नुकसान व यशोदा नदीला पूर येऊन हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आल्याने या भागाची पाहणी आ. राजेश बकाने यांनी शनिवारी केली तसेच शुक्रवारी झालेल्या पावसामुळे देवळी पुलगाव मतदार संघातील पिकांचे नुकसान झाले .आ. राजेश बकाने यांनी अल्लीपूर , कानगाव , कोसूर्ला, सोनेगाव , रोहनखेडा ,आदी गावात पावसाने हानीग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची व गावकऱ्यांची भेट घेऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पूरग्रस्त भागातीची पाहाणी करून यांच्या समस्या जाणून घेतल्या.प्रशासनाने तातडीने पंचनामे करून प्रस्ताव सादर करण्याचे एस डी ओ,तहसीलदार , यांना आदेश दिले शेतकऱ्यांना योग्य ती मदत व नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले यावेळी उपविभागीय अधिकारी आकाश अवथरे,नायब तहसीलदार कांबळे, मंडळ अधिकारी गायकवाड,तलाठी मनसावळी,अल्लीपुरचे ठाणेदार विजय कुमार घुले व त्यांची टीम उपास्थित होते.