दारूच्या नशेत दुचाकी चालवणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

Mon 12-Jan-2026,09:01 AM IST -07:00
Beach Activities

मुख्य संपदाक नावेद पठाण 

वर्धा | वर्धा बसस्थानकासमोर दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.५० वाजताच्या सुमारास दारू पिऊन दुचाकी चालवत असलेल्या एका आरोपीवर पोलिसांनी कारवाई केली. आरोपी आपल्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक एमएच ३२ आर ०५३४ घेऊन मद्यप्राशनाच्या अवस्थेत आढळून आला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १८५ (मद्यप्राशन करून वाहन चालवणे) तसेच कलम ३/१८१ अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय भांडेकर, अनिल तिवारी, पोलीस हवालदार सय्यद शब्बीर व पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप कोहळे यांनी केली.