जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ,चार जुगारांना घेतले ताब्यात

Wed 14-Jan-2026,05:28 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:- शारुखखान पठाण वरोरा

वरोरा:- तालुक्यातील चीनोरा या गावात काही युवक अवैध रित्या जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्याआधारे पोलिसांनी दि. 13जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान धाड टाकून 4 जुवा ऱ्यास अटक केली. रतन रामदास मंजुळकर वय २७ वर्ष, रा. टेंमुर्डा हुडकी ता. वरोरा , अशोक पुंडलीक यादव वय ६३ वर्ष रा. सरदार पटेल वार्ड वरोरा, अतुल रामकृष्ण दाते वय ३२ वर्ष रा. माडा कॉलनी वरोरा , संदीप रामभाउ लेंडांगे वय ३८ वर्ष रा. पाचगांव ठागरे ता. वरोरा, सुरज मुन्ना गोंडाने वय ३८ वर्ष रा. मालविय वार्ड वरोरा हे चिनोरा गावतील झुडपात पैशाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी अटक करून त्यांचेवर कलम १२ (अ) जुगार अधिनियम अन्वये विरुध्द गुन्हा दाखल केला .