हिंदी विश्वविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त ‘रन फॉर स्वदेशी’ रॅली
वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसूफ पठाण
वर्धा : वर्धा, दि. १२ जानेवारी २०२६ : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथे स्वामी विवेकानंद यांच्या १६४व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थी व संशोधकांसाठी ‘रन फॉर स्वदेशी’ या विशेष रॅलीचे आयोजन करण्यात आले.
शारीरिक शिक्षण व क्रीडा समितीचे अध्यक्ष प्रा. फरहद मलिक यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. विश्वविद्यालयाच्या फादर कामिल बुल्के आंतरराष्ट्रीय वसतिगृहातून रॅलीची सुरुवात होऊन सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहाजवळ तिचा समारोप झाला.
या प्रसंगी कुलानुशासक डॉ. राकेश मिश्र यांनी उपस्थित प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, संशोधक व विद्यार्थ्यांना स्वदेशीचा स्वीकार व राष्ट्रसेवेची शपथ दिली.
कार्यक्रमाला कुलसचिव क़ादर नवाझ खान, राष्ट्रीय सेवा योजना संयोजक डॉ. बालाजी चिरडे, क्रीडा सचिव डॉ. अनिकेत आंबेकर, सामान्य वैद्यकीय सल्लागार डॉ. हेमंत धामट यांच्यासह डॉ. संदीप सपकाले, डॉ. हेमचंद्र ससाने, डॉ. सीमा बर्गट, डॉ. मीरा निचळे, डॉ. आर. पी. यादव, डॉ. कोमल कुमार परदेसी, डॉ. गिरीशचंद्र पांडेय, बी. एस. मिरगे, संगीता मालवीय, राजीव पाठक, सुधीर खरकटे तसेच मोठ्या संख्येने संशोधक व विद्यार्थी उपस्थित होते.