चंद्रपूर शहरात प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
 
                                    
                                शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई करत २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले ३१ डिसेंबूर २०२४ अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेमधीतील अधिकारी व अंमलदार चंद्रपूर शहरात पेट्रोलीग करीत असताना गुप्त बातमीदार कडून माहिती मिळाली की रयतवारी बी.एम.टी.चौक चंद्रपूर परीसरात श्रावन सविता रा.रयतवारी चंद्रपूर हा त्याचे राहते घरी पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाची लपून विक्री करीत आहे.अशा माहितीवरून श्रावणकुमार शिवकुमार सविता (२८) रा.रयतवारी काॅलनी बी.एम.टी.चौक चंद्रपूर यांचे राहते घरी रेड केली असता त्याचे घरी विवीध रंगाचा प्लास्टिक चकरीवर गुडाळलेला प्रतिबंधीत नायलॉन मांजा धागा असलेल्या चकऱ्या असा एकूण २४ हजार रु.माल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहे.सदर आरोपी श्रावणकुमार शिवकुमार साविता (२८), रा.रयतवारी कॉलनी, बी.एम.टी चौक चंद्रपूर याने त्याचे राहते घरी पतंग उडविण्यासाठी तयार करण्यात येणारा प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा धागा अवैधरित्या विक्री करीता साठवुन ठेवला तसेच नमुद प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा धागा हा मानवी जिवितास तसेच पर्यावरण,पक्षी यांना घातक व धोकादायक असल्याचे माहिती असुन सुध्दा जाणिवपुर्वक स्वतःचे आर्थिक फायदयासाठी विक्रीकरीता ताब्यात बाळगले आहे. आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३, २९२, २९३ सहकलम ५, १५ पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे रामनगर करीत आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका,अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचा नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कांकेडवार,पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर,पोलीस नाईक संतोष येलपुलवार,अंमलदार गोपीनाथ नरोटे,गोपल आतकुलवार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे
 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
                     
                                                                 
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                            