"व्यसनांचा विळखा, वेळीच ओळखा सुंदर आयुष्य, सुदृढ बनवा"..
प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत शहरातील सुप्रसिद्ध श्री. विशाल गणेश मंडळाच्या परिसरातील गणेश भक्तांना व्यसनांचा विळखा वेळीच ओळखा, सुंदर आयुष्य सुंदर बनवा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांनी दि. १९ शनिवारी "श्रीं." आरती प्रसंगी केले आहे.
नशामुक्त भारत अभियान अंतर्गत, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, नशामुक्त भारत अभियान समिती, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवात गणेश भक्तांचे व्यसनमुक्ती प्रबोधन उपक्रम हाती घेण्यात आले. विधीज्ज्ञ विनोद खोत, नशामुक्त भारतअभियान समितीचे जिल्हा पदाधिकारी तथा नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक विशाल अग्रवाल, श्री. विशाल गणेश मंडळाचे अध्यक्ष राजेश गोरे, उपाध्यक्ष विशाल भोसले, सचिव ज्ञानेश्वर गाडे, कोषाध्यक्ष कृष्णा गोरे आदींची उपस्थिती होती. सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांनी व्यसनांच्या दुष्परिणामांची माहिती दिली. नशाबंदी मंडळ प्रकाशित व्यसनमुक्ती पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन नशाबंदी मंडळाच्या व्यसनमुक्ती दूत-मृण्मयी अग्रवाल यांनी केले. नशामुक्त भारत अभियान समितीच्या सखी शुभदा सरोदे यांच्या हस्ते व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा देखील गणेश भक्तांना देण्यात आली. प्रारंभी, "श्रीं" ची आरती पार पडली. गणेशोत्सवात गणेश भक्तांचे व्यसनमुक्ती प्रबोधन उपक्रम राबविल्याबद्दल केंद्र शासन पुरस्कृत, नशामुक्त भारत अभियान समितीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कौतुक केले.