अवैध मोहा दारूची वाहतूक उघड; ३.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त
अवैध मोहा दारूची वाहतूक उघड; ३.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त
नावेद पठाण मुख्य संपादक,वर्धा
सवांगी मेघे पोलिसांनी अवैध गावठी मोहा दारूच्या वाहतुकीविरोधात कारवाई करत एका आरोपीला अटक केली. या कारवाईत ५० लिटर गावठी मोहा दारूसह मारुती सुझुकी झेन कार असा एकूण ३ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना गस्तीदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. वर्धा तालुक्यातील शांतिनगर येथील संदीप श्रवण भगत (४४) हा निळ्या रंगाच्या मारुती सुझुकी झेन कार क्रमांक एमएच ४३ आर ३६९२ मधून पांढरकवडा-पारधीबेड्या परिसरातून गावठी मोहा दारू घेऊन सवांगी मेघेकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंच तसेच डाकघर कर्मचाऱ्यांच्या मदतीने नितीन किचन हॉटेलजवळ रस्त्यावर नाकाबंदी केली. काही वेळाने संशयित वाहन सवांगी मेघेच्या दिशेने येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव संदीप श्रवण भगत, वय ४४ वर्षे, रा. शांतिनगर, ता. वर्धा असे सांगितले.
वाहनाची झडती घेतली असता मागील डिक्कीत पाच प्लास्टिकच्या डब्यांमध्ये भरलेली ५० लिटर गावठी मोहा दारू आढळून आली. या दारूची किंमत १५ हजार रुपये, तर जुन्या वापरातील मारुती सुझुकी झेन कारची किंमत ३ लाख रुपये असा एकूण ३ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी आरोपी संदीप श्रवण भगत याच्याविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा सुनील महादिक तसेच सवांगी मेघे पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक विनोद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पीएल अभय खोबरागडे (ब.क्र. २७४), पीएल संजय पंचभाई (ब.क्र. ६५६), पीएस केतन बावनेर (ब.क्र. ९६१), पीएस शाम सलामे (ब.क्र. १६५४) आणि पीएस गौरव नर्तम (ब.क्र. ६८१) यांनी सहभाग घेतला.