चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजस्थानच्या दोन सराईत गुन्हेगारांना वडनेर पोलिसांकडून अटक

Thu 30-Jul-2026,07:44 AM IST -07:00
Beach Activities

चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजस्थानच्या दोन सराईत गुन्हेगारांना वडनेर पोलिसांकडून अटक, १२.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधि नाजिम खान वडनेर 

वडनेर वार्ताहर : राष्ट्रीय महामार्ग ४४ वर हिंगणघाट वरुण पत्नीवर उपचार करून गावी परत जाणाऱ्या दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आंतरराज्यीय आरोपींना वडनेर पोलिसांनी नाकाबंदी करून अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली महागडी कार, धारदार चाकू आणि बनावट नंबर प्लेट्ससह एकूण १२ लाख ६८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.फिर्यादी गुणवंत वसंतराव झाडे (रा. छोटी आर्वी, ता. हिंगणघाट) हे आपल्या पत्नीचा उपचार करून गावी परत येत होते. दरम्यान, वाटेत दोन अज्ञात इसमांनी त्यांना अडविले आणि धारदार चाकूचा धाक दाखवून त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावण्याचा प्रयत्न केल्याची घटना वडनेर पोलिस स्टेशन अंतर्गत घडली. या प्रकरणी आरोपी विरुद्ध वडनेर पोलीस ठाण्यात २८७/२६ कलम ३०९(९), ३(५) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलिसांची तत्परता आणि नाकाबंदीघटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) नायक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेर पोलीस स्टेशनच्या पथकाने परिसरात तात्काळ कडक नाकाबंदी लागू केली.व पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी घेराव घालून ताब्यात घेतले.अटक करण्यात आलेले आरोपी चे नाव विशालसिंग दयालसिंग गवारीया (वय २६ वर्ष,, रा. सुभाषनगर, जि. भिलवाडा, राजस्थान) सांवरमल माधवलाल लोहार वय २५ वर्ष, रा. सुरास, ता. रायपुर, जि. भिलवाडा, राजस्थान असे आहे.आरोपींची सखोल झडती घेतली असता त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले सफेद रंगाची महिंद्रा XUV 500 कार (क्र. RJ 06 BU 2005) – किंमत १२,००,०००/- रुपये वेगवेगळ्या राज्यांच्या ६ बनावट नंबर प्लेट्स (GJ 01 KQ 9500, RJ 14 UC 4643, AP 16 CV 1116)संबंधित नंबर प्लेट्सची बनावट आरसी बुक्स आणि २ फास्ट टॅगतीन महागडे मोबाईल फोन्स (ओप्पो आणि विवो कंपनीचे) – एकूण किंमत ६५,०००/- रुपये गुन्हा करण्यासाठी वापरलेला एक काळ्या रंगाचा धारदार चाकू – किंमत ३००/- रुपये असे ऐकून १२ लाख ६८ हजार रूपयाचे साहित्य जब्त करण्यात आहे आहे. या कारवाईमुळे आंतरराज्यीय गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश झाला असून, आरोपी इतरही काही गुन्ह्यांत सामील आहेत का, याचा तपास वडनेर पोलीस करत आहेत.