प्रभाग ७ मध्ये सिमेंट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते भूमिपूजन
प्रभाग ७ मध्ये सिमेंट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते भूमिपूजन
वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण
वर्धा : नगर परिषद वर्धा अंतर्गत सर्वसाधारण रस्ता अनुदान निधीतून प्रभाग क्रमांक ७ मधील घुगुस्कर गॅरेज ते पावडे नर्सिंग होम या मार्गावरील सिमेंट रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन शनिवारी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले.
गोंडप्लॉट येथे आयोजित या कार्यक्रमाला वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, बांधकाम सभापती राखी पांडे, नगर परिषद मुख्याधिकारी विजय देशमुख, नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी प्रभाग क्रमांक ७ मधील नागरिकांच्या मागणीनुसार या सिमेंट रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले. वर्धा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, शहरातील विविध विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका श्वेता पाठक व शैलेंद्र झाडे यांनी केले. तर माजी नगरसेवक वरुण पाठक यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.