संविधानावर होणारा प्रत्येक हल्ला परतवून लावू” – जिल्हाध्यक्ष शीतल ताई पवार दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ वर्ध्यात भीम आर्मीचे भव्य ठिय्या आंदोलन
संविधानावर होणारा प्रत्येक हल्ला परतवून लावू” – जिल्हाध्यक्ष शीतल ताई पवार दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ वर्ध्यात भीम आर्मीचे भव्य ठिय्या आंदोलन
प्रतिनिधि इरशाद शाह वर्धा
वर्धा, दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनकर्त्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचा तीव्र निषेध आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भीम आर्मी भारत एकता मिशन, वर्धा जिल्हा यांच्या वतीने भारत बंद अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत माहिती देताना भीम आर्मी भारत एकता मिशन, वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष मा. शीतल ताई पवार यांनी सांगितले की, “संविधानावर, सामाजिक न्यायावर आणि लोकशाही मूल्यांवर होणारा प्रत्येक हल्ला भीम आर्मी कदापि सहन करणार नाही. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर लाठीचार्ज करणे ही लोकशाहीची गळचेपी आहे. या दडपशाहीविरोधात संविधानवादी जनता आता एकजूट होऊन संघर्ष करणार आहे.”
त्या पुढे म्हणाल्या की, मा. भाई चंद्रशेखर आझाद (रावण) यांच्या आदेशानुसार देशभर सुरू असलेल्या भारत बंद आंदोलनाला वर्धा जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, दि. २५ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे हजारो भीमसैनिक, महिला, युवक, विद्यार्थी आणि संविधानप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
शीतल ताई पवार यांनी वर्धा जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी संघटना, बहुजन समाज, सामाजिक संघटना, युवक-युवती, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले की, “अन्याय करणाऱ्यांना कायद्यापुढे झुकावेच लागेल. संविधानाच्या रक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी भीम आर्मीचा संघर्ष अधिक तीव्र होईल. आम्ही भीतीपोटी गप्प बसणारे नाही; संविधानाच्या सन्मानासाठी शेवटपर्यंत लढणारे आहोत.”
या आंदोलनातून दिल्लीतील लाठीचार्जचा तीव्र निषेध, दोषींवर कठोर कारवाई आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे