वुशू हा स्वसंरक्षणासाठी प्रभावी माध्यम : समीर देशमुख
वुशू हा स्वसंरक्षणासाठी प्रभावी माध्यम : समीर देशमुख
प्रथम जिल्हास्तरीय ॲमेच्युअर वुशू स्पर्धेचा उत्साहात समारोप
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
वर्धा : वुशू हा चिनी मार्शल आर्टवर आधारित लोकप्रिय आंतरराष्ट्रीय खेळ असून शारीरिक चपळता, शक्ती, शौर्य आणि स्वसंरक्षण कौशल्य विकसित करण्यासाठी तो प्रभावी माध्यम आहे. वुशू हा केवळ खेळ नसून स्वसंरक्षणासाठीही उपयुक्त असल्याचे प्रतिपादन यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख यांनी केले.
यशवंत महाविद्यालयाच्या सभागृहात २० सप्टेंबर रोजी ॲमेच्युअर वुशू स्पोर्ट्स असोसिएशन, वर्धाच्या वतीने प्रथम जिल्हास्तरीय ॲमेच्युअर वुशू स्पर्धा २०२६-२७ आयोजित करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून समीर देशमुख बोलत होते.
स्पर्धेचे उद्घाटन मार्शल आर्ट स्पोर्ट्स अकादमीचे राष्ट्रीय सल्लागार इमरान राही यांच्या हस्ते झाले. यावेळी उपकार्यकारी अभियंता अमोल आठवले, ॲमेच्युअर वुशू स्पोर्ट्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष उल्हास वाघ, ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय सचिव किरण फुलझेले, लॉयन्स क्लबचे माजी अध्यक्ष विजय सत्यम, ज्येष्ठ समाजसेवी राजू लभाणे, राजेंद्र शेंडे, युवराज लाडे, उपविभागीय अभियंता अभय शिंगाडे आदी उपस्थित होते.
क्रीडा क्षेत्र हे आता केवळ छंद किंवा मनोरंजनाचे साधन राहिले नसून त्यातून करिअर आणि रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे इमरान राही यांनी सांगितले. अमोल आठवले, किरण फुलझेले आणि उल्हास वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना विक्रांत गव्हाणे यांनी केली. सूत्रसंचालन पुनम विश्वास यांनी तर आभार नदीम शेख यांनी मानले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अचिंत निगडे, प्राची धाबेकर, संगम गव्हाणे, पुनम विश्वास, हर्षल मोहितकर, तेजस्विनी निमसडकर, येदात किटे, नयन जाधव, प्रतीक पाटील, आयुष मडावी, राहुल राऊत, अफनान शेख, प्रतिमेश घाटोळे, साहिल गेडाम, संकेत ठाकरे, तन्मय मोहळे, भूमिका कन्नोडे, राहुल राय, विराज कुळवे, रहमान शेख, तन्मय येळोरे, सोहम जनबंधू आदींनी परिश्रम घेतले.