वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग वर्धा हिंगणघाट तालुका अध्यक्षपदी रामाजी महादेव धनविज यांची निवड; सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

Mon 21-Sep-2026,05:32 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लिपूर 

 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग राज्यस्तरीय गाव तेथे शाखा अभियान सोहळा १९ सप्टेंबर रोजी सदभावना भवन काँग्रेस कमिटी, मगन संग्रालय समोर बॅचरल रोड वर्धा येथे संपन्न झाला .यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आली 

डॉ. अनिरुद्ध वनकर प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग, रणजितदादा कांबळे माजी राज्यमंत्री तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, संजय मेश्राम आमदार विधानसभा क्षेत्र उमरेड जील्हा नागपूर, ॲड. चारुलता टोकस माजी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, अनंतजी मोहड प्रदेश सरचिटणीस तथा शिदोरी मासिक संपादक मुंबई , डॉ. सुधिर पांगुळ अध्यक्ष नगर परीषद वर्धा, शेखर शेंडे माजी नगराध्यक्ष नगर परीषद वर्धा, अभ्यूदय मेघे सचिव प्रदेश काँग्रेस कमिटी, सुनिल कोल्हे जिल्हाध्यक्ष वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी, मनोज चांदुर कर माजी जिल्हाध्यक्ष वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी, धर्मपाल ताकसांडे जिल्हाध्यक्ष वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने निवड 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्यावतीने हिंगणघाट तालुका अध्यक्षपदी रामाजी महादेव धनविज यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

 त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन केले जात असून हिंगणघाट तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.

रामाजी महादेव धनविज यांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यात सातत्यपूर्ण कार्य, जनसंपर्क आणि संघटनात्मक कौशल्य विचारात घेऊन वरिष्ठ पातळीवरून ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आपल्या निवडीनंतर बोलताना, "वरिष्ठांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून तालुक्यात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन," असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग हिंगणघाट तालुका अध्यक्ष रामाजी महादेव धनविज यांनी व्यक्त केला.

पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा 

त्यांच्या या निवडीबद्दल गोपाल मेघरे , बच्चू वाटखेडे , सचिन पारसडे , रत्नाकर वैद्य , श्रीराम साखरकर , खलील कुरेशी , असलम पठाण, रवी वैद्य, हारून अली, राजू मंगेकर, अजय बाळसराफ , सुरेश सतोकर व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग हिंगणघाट तालुका अध्यक्ष रामाजी महादेव धनविज त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.