रेल्वे चौकातील नाष्टाच्या दुकाना समोरुन दुचाकी वाहन चोरी
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : एका दुचाकी मालकाला आपली दुचाकी हॉटेल समोर ठेवून नाष्टा करायला जाणे महागात पडले. जेव्हा त्यांनी हॉटेल समोर ठेवलेली दुचाकी अज्ञात चोराने लंपास केले.शहरातील रेल्वे चौक येथे रेल्वे मध्ये कार्यरत कनिष्ठ अभियंता शेख जमीर शेख इब्राहिम रेल्वे वॉर्ड हे नाष्टा करायला २५ जानेवारी ला सकाळी ८.५० वाजता आले. त्यांनी हॉटेल समोर दुचाकी क्रं एमएच ३४ एएल ६५३९ ठेवून नाष्टा करून ९.२० वाजता आले असता त्यांना त्यांची दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतले पण त्यांची दुचाकी मिळून आली नाही.शेख जमीर यांनी २८ जानेवारी ला बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून पोलीसांनी अज्ञात चोरा विरुध्द कलम ३०३(२) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
Related News
पटेल चौकातील सट्टा अड्ड्यावर LCB ची धडक; चौघांना अटक, २४,६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
5 hrs ago | Naved Pathan
वर्ध्याच्या भर गर्दीच्या भागात चेन स्नॅचिंग; बापूंच्या नगरीत चोरट्यांचे पोलिसांना उघड आव्हान
4 days ago | Naved Pathan
बल्लारपूरात अतिक्रमणामुळे ट्रक आणि बस मध्ये भीषण अपघात,ट्रकच्या धडकेत बस वाहकाचा मृत्यू
5 days ago | Sajid Pathan
अवैध दारूविक्रेत्यांवर वर्धा पोलिसांची ‘वॉशआऊट’ मोहीम; १०४ गुन्हे दाखल, १ कोटी ६६ लाखांचा मुद्देमाल जप्त
6 days ago | Naved Pathan
रेल्वे स्थानकात मानेपासून धड वेगळ्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह:हत्या की आत्महत्या
8 days ago | Sajid Pathan
हिंगणघाट पोलिसांची कारवाई; एमडी ड्रग्ससह एक आरोपी अटकेत, दुचाकीसह ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त
8 days ago | Naved Pathan