सततच्या पावसामुळे कुंभार समाजावर उपासमारीची वेळ

Tue 23-Sep-2025,10:04 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी :-अशोक इंगोले हिंगोली

 हिंगोली :-वसमत येथील गेल्या अनेक वर्षापासून कुंभार समाज किरकोळ व्यवसाय म्हणून विविध सणात कारागिरांनी मातीने तयार केलेल्या वस्तू त्यामध्ये लक्ष्मी मूर्ती,उदाणे,कुंडे,घट, लहान,मोठे,चिटकी,दिये,बोडके,झाकण्या,सानका,पारलं, खेळबांडे व इत्यादी व्यवसाय शहरात विक्री करत असतात.या व्यवसाय मुळे कुटुंबाचा उदारनिर्वाह करत असतात.परंतु सतत पाऊस सुरु असल्यामुळे वस्तूंची विक्री होत नाही.पण या तीन दिवसापासून पाऊस जोरदार सुरु असल्यामुळे. दुकानात व रस्त्याच्या कडेला असलेल्या लहान लहान दुकानांचा,व वस्तूंचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.कित्येक गरीब होतकरू कुंभारांचा अतिशय नुकसान झालं आहे.त्यामुळे उपस्मरिची वेळ त्या कुटुंबावर आली आहे. पोलीस सटेशन समोर असलेल्या दुकानात व रस्त्यावर असलेले कुंभार व्यसायिक त्या ठिकाणी जाऊन राष्ट्रवादी चे कार्याध्यक्ष अमजद खान उर्ग नम्मू यांनी पाहणी केली व त्या व्यपारी कुंभाराच्या समस्या जाणून घेतल्या. पाऊसामुळे आमचे खूप मोठे नुकसान झाले असून उपस्मरिची वेळ आली असे सांगत महिला कुंभार रडत असता .ती परिस्थिती बघून त्वरित त्या सर्व महिला व्यापारी यांना सोबत घेऊन अमजद खान उर्फ नम्मू यांनी नगर परिषद व तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन अधिकारी तहसीलदार शारदा दळवी व मुख्याधिकारी आशुतोष चिंचालकर यांना मदतीची मागणी केली.लगेच मुख्यधिकारी आशुतोष चिंचालकर यांनी कर्मचारी यांना पंचनामा करण्यास आदेश दिले. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्याध्यक्ष अमजद खान उर्फ नम्मू व कुंभार व्यवसायिक अन्नपूर्णा बगडे,नंदा बसोडे,ममता पेंडारकर,जया बसोडे,गंगु बगडे,कमळा बहने,कसा,गंगा पारडे,शेळू,मीरा पिराजी सविता बेणे, व इतर महिला सहभाग घेतला.