हयातनगर ते खुरगाव धम्मध्वज पदयात्रेचे विविध ठिकाणी जोरदार स्वागत
प्रतिनिधी:-अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:हिंगोली वसमत येथे आज 8 जानेवारी रोजी. खुरगाव-नांदेड येथे होणाऱ्या धम्मध्वज दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हयातनगर इंदिरानगर,सारोळा,मुडी आदी गावातील धर्मउपासक उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.गावोगावी धम्मपदयात्रेचे जोरदार
स्वागत करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वसमत येथे भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली होती.
यात्रेच्या यशस्वी ते साठी बाळासाहेब उर्फ चंद्रमुनी गोडबोले,भिमराव खाडे, केशव कापुरे, मिराजी खाडे, बोद्धाचार्य खाडे, गोदावरी बाई खाडे, संताबाई गोडबोले आबा सावळे नांदेड, तान्हाबाई खाडे आदी उपासिका सहभागी होत्या.
पुज्य भदंतपंय्या बोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनात भंते शिल किर्ती यांच्या नेतृत्वात धम्म बांधव भगिनीनी, खुरगावच्या दिशेने वाटचाल केली.
वसमत येथे यशवंतराव उबारे यांच्यावतीने भोजनदान तर भंते बुद्धभूषण यांनी धम्म देसना दिली प्रा. सुभाष मस्के श्रीरंग भोरात, विनयकुमार एंगडे, नगरसेवक राजकुमार एगंडे ,गौतम मोगले,आनंद करवंदे तुकापाटील, आनंद खरे,भगवान शिवभगत आदी मान्यवरांनी धम्मपद यात्रेचे स्वागत केले.