महामानवांचे विचार अंगिकृत करा जयंती निमित्त व्यसनमुक्ती प्रबोधन
प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:वसमत येथें आज स्वातंत्र्य सेनानी तथा सर्वोदय विचारवंत गंगाप्रसादजी अग्रवाल यांचा वैचारिक वारसा जपण्यासाठी महामानवांचे विचार अंगीकार करावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांनी दि. ७ जानेवारी बुधवारी येथे केले.स्वातंत्र्यसेनानी तथा सर्वोदय विचारवंत गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या १०३ व्या जयंती निमित्त शहरातील मातोश्री गंगादेवी देवडा निवासी अंध विद्यालयात प्रबोधनपर व्यसनमुक्ती उपक्रम पार पडला. नशामुक्त भारत अभियान समितीचे अशासकीय सदस्य श्याम सोळंके, नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक विशाल अग्रवाल, मुख्याध्यापक पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. महामानवांचे व्यसनमुक्तीपर चित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे महावाक्य निदर्शनास आणून देण्यात आले. तंबाखू-तंबाखुजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत विवेचन करण्यात आले. तंबाखू पदार्थांचे दहन करण्यात आले. निवासी विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका, कर्मचार्यांची उपस्थिती होती.