सिंधी मेघे येथील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था; तत्काळ दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

Tue 30-Dec-2025,08:57 AM IST -07:00
Beach Activities

वर्धा तालुका प्रतिनिधि इरशाद शाह 

वर्धा:वर्धा सिंधी मेघे ग्रामपंचायत, वार्ड क्रमांक ४ अंतर्गत अग्निहोत्री कॉलेज ते न्यू रेल्वे कॉलनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. हा रस्ता शाळा, महाविद्यालय व रुग्णालयात जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधीं कडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून अपघातांची शक्यताही वाढली आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तात्काळ उपाययोजना करून रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देत जिल्हा परिषद, वर्धा यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे निहाल पांडे, जिल्हा संपर्क प्रमुख अमित भोसले, जिल्हा संघटक दिनेश परचाके, तालुका प्रमुख इर्शाद शाह, शेखर इंगोले, नाजिश फारुखी, अमन नारायणे, आशिष जाचक, आमिन पठाण आदी उपस्थित होते.