अल्लीपूर येथे शेतकरी शंकरपट व कृषी प्रदर्शनीला जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांची भेट
तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लिपूर
वर्धा:दिनांक 14 जानेवारी ला अल्लीपूर येथे शेतकरी शंकरपट व भव्य कृषी प्रदर्शनीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी भेट दिली. स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी 'शंकरपट' व 'कृषी प्रदर्शनी' उत्सवासाठी पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
या शंकरपटात विविध जिल्ह्यांतून आलेल्या नामांकित बैलजोड्यांनी आपला वेग आणि शिस्त दाखवली. बैलांच्या अंगातील ताकद आणि गाडा मालकांचे कौशल्य पाहून उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. या उपक्रमामुळे ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडल्याची भावना जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर,
प्रभाकर फटिंग,जिल्हा कार्याध्यक्ष सचिन पारसडे उपस्थित होते.