महाबोधी महाविहार बुद्ध गया मुक्ती आंदोलन जनजागृती अभियानासाठी रॅली व सभा

Thu 15-Jan-2026,04:45 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : महाबोधी महाविहार, बुद्ध गया मुक्ती आंदोलनाच्या जनजागृतीसाठी बल्लारपूर शहरात भव्य रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर जनजागृती रॅलीची सुरुवात १५ जानेवारी २०२६ (गुरुवार) रोजी दुपारी १.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून होणार असून रॅली पाली युद्धविहार येथे समारोपास पोहोचणार आहे.

यानंतर याच दिवशी दुपारी ३.०० वाजता जनजागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये गहरा और असरदार है, धम्म का किरदार, क्रांति की ज्वाला को, क्या रोकेगी दीवार या प्रेरणादायी विचारांचा संदेश देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी भन्ते विनाचार्य व भिक्खु संघ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून ते उपस्थितांना धम्म, समता व सामाजिक न्यायाच्या विचारांनी मार्गदर्शन करणार आहेत.

सदर जनजागृती अभियानाचे आयोजन समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा तसेच बल्लारपूर नगरातील समस्त बौद्ध बांधवांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे.