"अजितदादांच्या जयंतीनिमित्त जि.प. शाळेत विद्यार्थ्यांना साहित्याचा लाभ"नागनाथ नरवाडें यांचा प्रेरणादायी उपक्रम

Wed 29-Jul-2026,08:24 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : वसमत येथील थोरावा या गावी.दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या 'जनसेवा सप्ताह' अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, थोरावा येथे नागनाथ नरवाडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या हातात शैक्षणिक साहित्य पोहोचवण्यात आले. एका समाजोपयोगी उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरखरा आनंद फुलवला.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला आमदार राजू भैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालू मामा ढोरे, लक्ष्मीकांत नवघरे, विश्वनाथ फेगडे, शाम कदम, उपसरपंच सोपान देवरे, तंटामुक्ती अध्यक्ष किशनराव देवरे यांच्यासह अंगद कुंभारकर, संतराम पांचाळ, योगाजी नरवाडे, श्रीनिवास टोंग,केशव पुंजारे, प्रभु हरणे भानुदास देवरे,शिवराज गुंजकर, वसंत गुंजकर, शिवराज गाडगे, विष्णू हरबळे, विशाल देवरे आणि गोविंद फेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शकुंतला फेगडे, पुष्पा जोशी, जयमाला मिरकुटे, उषा घोडके, सुनिता वर्मा, ज्योती चौंढे, सुनिल जगताप, व्यंकटी दळवी, किशोर पवार आणि शिवदास पोटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जनसेवा सप्ताहाचा हा आदर्श पॅटर्न सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.