मारपीटचा गुन्ह्यातील आरोपी विक्रम निषाद ला राजुरा पोलीसांनी केले फरार घोषित
 
                                    
                                शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर:चंद्रपूर राजुरा पोलीसांनी मारपीटचा गुन्ह्यातील आरोपी विक्रम निषाद उर्फ वी. एन रा बामणी त. बल्लारपूर याला फरार घोषित केले आहे.शंकर पांडुरंग पाचपुते (५९) रा. धोपटाळा कॉलनी हे आपल्या दुचाकीने गोवरी पोवणी कडे जात असताना त्यांना यश जिवतीडे सह ६ आरोपीने जबरदस्ती ने रोडच्या बाजूचा जंगलात नेऊन लोखंडी रॉड ने हातावर व पायावर मारून हात व पाय मोडून गंभीर जखमी केले होते. त्यावरून फिर्यादीच्या बयानावरून राजुरा पोलीसांनी अप क्रं २२७ / २०२५ कलम ३१०(२), ११८(२), ६१(२), १३६(२), ३११ बीएनएस अन्वये गुन्हा नोंदवून त्याच दिवशी ६ पैकी ५ आरोपींना राजुरा पोलीसांनी अटक केले होते.परंतु त्या दिवसापासून आरोपी विक्रम निषाद उर्फ व्ही. एन. रा. बामणी ता. बल्लारपुर हा फरार असुन त्याचा शोध सुरू आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभानीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे करीत आहेत. सदर आरोपी कुणास आढळल्यास किंवा त्याची माहिती असल्यास गोविंद चाटे पोलीस उपनिरीक्षक राजुरा मोबाईल क्रं. ९८६०६०१८१० वर कळावे.
 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
                     
                                                                 
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                            