संभाजी ब्रिगेडचे सर्कल प्रमुखांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश

Sat 02-Nov-2024,06:13 AM IST -07:00
Beach Activities

अब्दुल कदीर बख्श

गिरड येथील संभाजी ब्रिगेडचे सर्कल प्रमुख राहुल वाढई यांनी पक्षाच्या कार्याशी प्रभावित होऊन जेष्ठ नेते सीताराम भुते यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश घेतला.राहुल वाढई गेल्या 10 वर्षांपासून संभाजी ब्रिगेडचे सर्कल प्रमुख म्हणून कार्यरत आहे. त्यांनी स्थानीय शिवसेनेच्या कार्याला प्रेरित होऊन पक्ष प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.

गिरड येथे पार पडलेल्या कार्यकर्ता बैठकीत शिवसेनेचे जेष्ठ नेते सीताराम भुते यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश घेतला.यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख लक्ष्मण भोयर, गिरड सर्कल प्रमुख सुमित भिसेकर, 

युवा सेना उपतालुका प्रमुख संजय खोंडे,प्रभाकर चामचोर, राकेश चंदनखेडे, शहर प्रमुख संजय बोरेकर, कुंडलिक सहारे, राजेंराम भिसेकर, अजय झाडे, अमरसिंग अकाली, बालू झाडे, कवडू श्रीरामे, रामचंद्र भिसेकर, दिलीप तुपे, राजू डेकाटे, सुधाकर मोटघरे, रामभाऊ ढोके यांची प्रमुख उपस्थिती होती.येणाऱ्या काळात शिवसेना मजबूत करण्याचा संकल्प उपस्थितांनी घेतला.