महेश ज्ञानपीठच्या विद्यार्थ्यांची कुस्ती स्पर्धेत जिल्हा स्तरावर निवड.

प्रतिनिधि आसीफ मलनस हिंगणघाट
वर्धा:क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वर्धा, जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी सार्वजनिक वाचनालय नगरपरिषद टाका ग्राउंड, हिंगणघाट येथे तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेतील अंतिम सामन्यात महेश ज्ञानपीठच्या १७ वर्ष वयोगटातील मुलांच्या गटात चि. तुषार देवतळे तसेच १७ वर्ष वयोगटातील मुलींच्या गटात कु.धनश्री भोयर यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला. आणि वर्धा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता आपले स्थान निश्चित केले.यशस्वी झालेल्या सर्व खेळाडूंनी आपल्या विजयाचे श्रेय संचालक मंडळाचे अध्यक्ष गिरधरबाबू राठी, सर्व सदस्य, प्राचार्या वैशाली पोळ, उपप्राचार्य दिगंबर खटी, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी, क्रीडा अधिकारी सायली चन्नावर, तालुका क्रीडा संयोजक बी. एल.खांडरे, क्रीडा शिक्षक सचिन मुळे, पूनम नानवटकर आणि सर्व शिक्षकांना दिले त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.