३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर वर्धा पोलिसांची मोठी कारवाई; 18,19,500/- लाखांच्या मुद्देमालासह अवैध दारू साठा जप्त
वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधि युसूफ पठाण
वर्धा वर्धा: येत्या ३१ डिसेंबर (थर्टी फर्स्ट) निमित्ताने जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांना अवैध धंद्यांवर, विशेषतः अवैध दारू साठा, विक्री व वाहतुकीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
याच सूचनांच्या अनुषंगाने, दि. 29/12/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एकूण 18,19,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कारवाईचा तपशील:
आज दि. 29/12/2025 रोजी गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संत कबीर वार्ड, हिंगणघाट
येथील एका दुकानांमध्ये छापा टाकला असता, 1) आकाश उर्फ टिन्या गवळी रा. संत कबीर वार्ड हिंगणघाट (पसार)
2) अमरदिप उर्फ बॉंब जिवणे रा. चंद्रपुर, ह.मु. संत कबीर वार्ड हिंगणघाट (पसार) हे अवैध देशी व विदेशी दारूची साठवणूक करून ठेवलेल्या दुकानांमध्ये रेड केला असता आरोपी नंबर 1 पोलिसांची चाहूल लागताच आरोपी मोक्क्यावरून पळून पसार झाला.
जप्त केलेला मुद्देमाल:
| दारूचा प्रकार / वस्तू | नग / संख्या | एकूण किंमत (रु.)
| देशी दारू प्रीमियम डिलक्स सुपर संत्रा कंपनी (90 एम.एल.) | 3350 शिशा | 3,35,000/- |
| टंगो पंच कंपनी (90 एम.एल.) | 1880 शिशा | 1,88,000/- |
| देशी दारू कोकण प्रीमियम नं. 01 (90 एम.एल.) | 1800 शिश्या | 1,80,000/- |
| देशी दारू भिंगरी संत्रा कंपनी (90 एम.एल.) | 500 शिश्या | 50,000/- | रॉकेट देशी संत्रा कंपनी (९० एम.एल.) | 300 शिश्या | 30,000/- |
| आर एस कंपनी (2000 एम.एल.) | 12 बंपर | 36000/- |
एक प्लास्टिक कॅरेट किंमत 500/- रु.
| महिंद्रा स्कॉर्पियो कार (MH-20-DJ-4740) | १ नग | 10,00,000/- |
| एकूण किंमत | | 18,19,500/- |
सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अशी कठोर कारवाई यापुढेही सुरू राहील, असा इशारा पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिली आहे.
तपास पथक:
सदर कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी यांच्या सूचनेनुसार पो.उपनि. ओमप्रकाश नागापुरे, पो.हवा.अमर लाखे, धर्मेंद्र अकाली, रोशन श्निंबोळकर,दिपक जंगले,पवन पन्नासे, पो.अं. मुकेश ढोके, प्रफुल पुनवटकर, हर्षल सोनटक्के, रितेश कुऱ्हाडकर, राहुल लुटे सर्व नेमणुक - स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.