हिंगणघाटचे यशवंत गडवार नागपूर आकाशवाणीवर झळकणार
हिंगणघाटचे यशवंत गडवार नागपूर आकाशवाणीवर झळकणार
हिंगणघाट निखिल ठाकरे
स्थानिक संत तुकडोजी वार्डातील यशिया गार्डन नर्सरीचे संचालक तसेच नूतन उच्च प्राथमिक शाळा, हिंगणघाट येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. यशवंत वामनराव गडवार यांची नागपूर आकाशवाणी केंद्रावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
दिनांक १५ फेब्रुवारी २०२६, रविवार रोजी दुपारी ११.३० वाजता नागपूर आकाशवाणी केंद्रावर प्रसारित होणाऱ्या ‘इंद्रधनुष्य – गंमत जंमत’ या कार्यक्रमांतर्गत ही मुलाखत होणार असून, त्यात पक्षी निरीक्षण व निसर्ग संवर्धन या विषयांवर ते आपले अनुभव मांडणार आहेत.
श्री. गडवार यांनी आजवर विविध निसर्गरम्य परिसरांमध्ये पक्षी निरीक्षण करून निसर्ग संवर्धनाच्या कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत नागपूर आकाशवाणी केंद्राने ही मुलाखत आयोजित केली आहे.
ही मुलाखत सर्व निसर्गप्रेमी व श्रोत्यांनी अवश्य ऐकावी, असे आवाहन निसर्गसाथी फोरमचे अध्यक्ष डॉ. बालाजी राजूरकर यांच्यासह प्रभाकर कोळसे, मियाजुद्दीन सिद्दिकी, वासुदेव पडवे, संगीता मस्कर, राजश्री विरूळकर, राकेश झाडे व गुणवंत ठाकरे यांनी केले आहे.