श्री संत गजानन महाराज प्रगटदीन सोहळा व भव्य वारकरी दिंडी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडला
श्री संत गजानन महाराज प्रगटदीन सोहळा व भव्य वारकरी दिंडी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडला
प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लीपूर
हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपुर येथे श्री संत गजानन महाराज प्रगटदीन सोहळा 8 फेब्रुवारीला श्री संत साई गजानन महाराज व दुर्गा माता मंदिराच्या आवारात मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यानिमित्त रविवारी भव्य दिव्य अशा पालखी दिंडी सोहळ्यात विविध गावांतील ३० च्या वर भजनी मंडळीसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने गावात भक्तांचा जनसागर उसळला होता यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते, गावात जणू भक्तीचा मळा फुलल्याचे चित्र पाहायला मिळाले. यात टाळ मृदगांचे तालावर नाचणारे वारकरी आणि हरिनामाचा गजर पाहता संत गजानन महाराजांचे जयघोषाने अल्लिपूर नगरी जणू दुमदुमली होती.
श्री संत साई गजानन मंदिरातून सकाळी दहा वाजता पालखी निघाली यावेळी मुख्यप्रवेशद्वारावर बैल बंडी रथाचे पुजन धनराज सुपारे यांचे हस्ते पार पडले.
यात विविध मंडळानी तयार केलेली आकर्षक वेशभूषा, दाखल झालेले अश्व, बँडपथक, आणि भजनी मंडळाचा सहभाग असलेला हा दिंडी सोहळा हरिनामाचा जयघोष करीत सदर दिंडी सोहळा प्रमूख मार्गाने
प्रदक्षिणा घालत गजनान महाराज मंदिर स्थळावर पोहचल्यावर तिथे अश्वाचे रिंगण पार पडले.
यावेळी हातात भगव्या पताका घेत धावणारे वारकरी, विणेकरी, पकवाज वादक, डोक्यावर तुळसी वृंदावन, पारायण गाथा घेऊन धावा
करीत सहभागी झालेल्या महिला आणि हरीपाठ मंडळाचे वतीने मानवी साखळी द्वारे उंच मनोरा करीत वाजविला जाणारा पकवाज हे सगळे क्षण डोळ्याचे पारणे फेडणारे ठरले हे क्षण पाहण्यासाठी मैदानावर भाविकांची महिलांची
मोठी गर्दी उसळली होती. पालखी सोहळ्यानिमित्त
गावातील रस्त्यावर महिलांनी रांगोळ्या काढून रस्त्याची सजावट करण्यात आली होती, ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या, पालखी गावातील प्रमुख मार्गाने जात असताना ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले.
सहभागी भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी अल्पोहार, चहापाण्याची व्यवस्था ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती.
मुख्य मार्गाने दिंडी पालखी पोलीस स्टेशन रोड मार्गे दुपारी चार वाजता मुख्य मंदिराजवळ येताच या दिंडी सोहळ्याची सांगता झाली. त्यानंतर गावातून व बाहेर गावावरून आलेल्या सर्व दिंड्यांना मान्यवरांच्या हस्ते उचित मानधन व पारितोषिकांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नानाभाऊ ढगे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नाथ महाराज , लक्ष्मण भारस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ह.भ.प. नाथ महाराज यांनी उपस्थितांना प्रबोधन केले तसेच सात दिवस चाललेल्या सप्ताहाचा समारोपही याच कार्यक्रमाने करन्यात आला कार्यक्रमाचे संचालन सचिन पारसाडे यांनी केले तरआभार प्रदर्शन संदीप नरड यांनी मानले कार्यक्रमानंतर संपूर्ण गावासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.