ओंकारेश्वर महादेव मंदिरात महाआरतीचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न

Mon 19-Jan-2026,11:23 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली :वसमत शहरातील रवींद्रनाथ टागोर कॉलनी येथील सुप्रसिद्ध ओंकारेश्वर महादेव मंदिरात दिनांक १९ जानेवारी (सोमवार) रोजी महाआरतीचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. या पवित्र आरतीचे आयोजन सर्व समाजाच्या सुखदुःखात धावून जाणारे गोरगरिबांना मदत करणारे प्रभाग क्रमांक १५ चे नगरसेवक राजकुमार रावण एंगडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. महाआरतीदरम्यान संपूर्ण परिसर “हर हर महादेव”च्या जयघोषाने दुमदुमून गेला. याप्रसंगी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

या कार्यक्रमास वार्ड क्रमांक 15 येथील नगरसेविका गोरे , रवींद्रनाथ टागोर सोसायटीचे अध्यक्ष दुमाने सर, सचिव स्वामी काका, सदस्य सिद्धार्थ कांबळे, दिनेश कदम, ॲड. भूषण कांबळे, इंजि. श्रीरंग मुळे, निळकंठ आंबेकर, ऋषी एंगडे, वाघमारे, महेंद्र पाईकराव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता. कार्यक्रमास रत्नमाला एंगडे,धम्मदीपा कांबळे, कमल मुळे, सुमन थोरात,गोरे, डॉ. भाग्यश्री कांबळे,वाघमारे,सुशीला गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भाविक उपस्थित होत्या.

या महाआरती कार्यक्रमामुळे परिसरात भक्तीमय व अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून भाविकांकडून कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.