वर्धा जिल्ह्यात रेती वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड व अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांच्या जीवितास निर्माण झालेला धोका व संबंधित प्रकारांची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याबाबत.

Sat 07-Feb-2026,02:32 AM IST -07:00
Beach Activities

वर्धा जिल्ह्यात रेती वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड व अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांच्या जीवितास निर्माण झालेला धोका व संबंधित प्रकारांची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याबाबत.

वर्धा : तालुका प्रतिनिधी इरशाद शहा

वर्धा वर्धा महोदय सेवेशी नम्र निवेदन आहे की वर्धा जिल्ह्यात घाट लिलाव झाले असून आपण नदी मधून रेती काढण्याची परवानगी दिली आहे असे माहित पडले पण सदर घाटमालक जिल्हा प्रशासन च्या नियम चे पालन करत आहे का यांच्यावर लक्ष देण्याचा काम कुठलाही जबाबदार अधिकारी करत नाही असे दिसत आहे पण ठीक आहे तो प्रशासनाचा भाग आहे पण मात्र यामध्ये एक गोष्ट खूप गंभीर आहे की संबंधित रेती वाहतूक करणारे टिप्पर गाड्या मोठ्या प्रमाणात अतिशय वेगाने रस्त्याने सायंकाळी रात्री जात आहे

 संबंधित वाहतूक करणाऱ्या गाड्या इतक्या वेगाने आहे की त्यांचा तोल कधी जाऊ शकतो आणि एखाद्याचा जीव ते घेऊ शकतात आणि प्रत्येक गाडी ओव्हरलोड असल्यामुळे संबंधित गाडी चा तोल जाणार हे स्वाभाविकच आहे पण यावर कुठलाही R.T.O विभाग चां अधिकारी कार्यवाही करत नाही कारण संबंधित विभाग ला ही बाब दुर्लक्ष करण्यात करीता 5000 रुपये प्रति 6 चक्का टीप्पर गाडी व 10000 रुपये 12 चक्का या प्रमाणे महिना भेटत असते पण या प्रकार मुळे एखाद्याचा जीव जाऊ शकते यावर प्रशासन का लक्ष देत नाही यापूर्वी देखील सेवाग्राम पुलावर एक मुलीचा सकाळी 9am रेतीच्या गाडीमुळे अपघात झाला व तिचा जागेस मृत्यू देखील झाला होता व अनेक असे घटना झाले आहे की ज्यामध्ये काही लोक गंभीर जखमी तर काही मृत्यू मुखी झाले आहे व इतर वेळा संबंधित अपघात करणारा वाहन हा रेती वाहतूक करणारा निघाला आहे

 त्यामुळे रेती माफिया खूप मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात सक्रिय आहे असं मनासाठी हरकत नाही बस आमचं म्हणणं इतकंच आहे की हे संबंधित ट्रक चालक यांना रेती वाहतूक करणाऱ्या गाडी हळू चालवण्याकरिता काहीतरी उपाययोजना करा सध्या घाट मधून रेती भरून देण्या करीता 14000 रुपये घाट चे ठेकेदार घेत आहे व कुठलीही रॉयल्टी देत नाही आहे

 पण तरी सुद्धा काय झाला कुठलाही अधिकारी गाडी पकडणार नाही याची पूर्ण शाश्वती तर घाट चे ठेकेदार घेतच आहे पोलीस स्टेशन सेवाग्राम सेलू तहसीलदार वर्धा तहसीलदार समुद्रपुर तहसीलदार व जिल्हा खणीकर्म अधिकारी सर्वांना पैशे (लाच) देऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्यामुळे कुठलाही अधिकारी संबंधित गाडी अडवणार नाही रॉयल्टी असो किंवा नसो काही चिंता करण्याची गरज नाही असे घाट ठेकेदार सांगत आहे

 मग इतका जोरदार प्रशासन चे सर्व विभाग ला पैशे देऊन जर मायक्रो प्लानिंग पद्धतीने कारभार सुरू आहे की कोण्ही गाडी अडवणार नाही तर मग इतके सुसाट अती वेगाने गाडी चालवणे का गरजेचे आहे कोणाचा जीव या अती वेगाने चालणारे रेती वाहतूक चे ट्रक घेऊ शकते याची तरी काळजी प्रशासन ने घेतली पाहिजे इतकीच आमची अपेक्षा आहे आपण प्रचंड भ्रष्टाचार करा करोडो रुपये कमवा पण कमीत कमी आम्ही वर्धेकरांच्या जीवाशी खेळू नका इतकीच अपेक्षा या निवेदन च्या वतीने आम्ही करत आहों.

युवा: परीवर्तन की आवाज संघटना चे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे,जिल्हा अध्यक्ष विशाल इचपाडे,जिल्हा संघटक दिनेश परचाके,जिल्हा सम्पर्क प्रमुख अमित भोसले, वर्धा तालुका प्रमुख इरशाद शहा, उपाध्यक्ष वर्धा अमन नारायण,आशिष जाचक, सुभाषभाऊ शिडाम, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.