हिंगणघाटात शिवसेना (उबाठा)ची महत्त्वपूर्ण बैठक; आगामी निवडणुकांचे रणशिंग

Mon 09-Feb-2026,05:36 AM IST -07:00
Beach Activities

हिंगणघाटात शिवसेना (उबाठा)ची महत्त्वपूर्ण बैठक; आगामी निवडणुकांचे रणशिंग

 वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसुफ पठाण

हिंगणघाट येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बैठकीच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील निधनाबद्दल दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांना मार्गदर्शन करत संघटनात्मक बळकटीवर भर दिला. जिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे यांनी पक्षसंघटना अधिक मजबूत करून ग्रामीण भागात पक्षाची पकड वाढवण्याचे आवाहन केले.

उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे यांनी निवडणुकांच्या रणांगणात नव्या जोमाने उतरावे, असे आवाहन केले. बैठकीचे प्रास्ताविक तालुकाप्रमुख मनीष देवडे यांनी केले.

या बैठकीस भारत चौधरी, प्रकाश अनासाने, गोपाल मेघरे, महेंद्र महाजन यांच्यासह हिंगणघाट तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.