सर्वधर्म समाज पार्टीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; शिक्षणाच्या महत्त्वावर विशेष मार्गदर्शन
सर्वधर्म समाज पार्टीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; शिक्षणाच्या महत्त्वावर विशेष मार्गदर्शन
वर्धा, दि. १५ जून : प्रतिनिधी
सर्वधर्म समाज पार्टीच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अब्दुल वहीद पटेल होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून पक्षाचे राष्ट्रीय सल्लागार तसेच जी.एस. कॉलेज ऑफ कॉमर्सचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. अब्दुल बारी यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना शिक्षणाचे महत्त्व, करिअरच्या विविध संधी तसेच उच्च शिक्षणाच्या वाटचालीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या सुमारे ८० गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पेन देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ. अब्दुल वहीद पटेल यांनी पेनच्या महत्त्वावर प्रकाश टाकत शिक्षण हे समाज आणि राष्ट्राच्या विकासाचे सर्वात प्रभावी साधन असल्याचे सांगितले.
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्रशासकीय अधिकारी व समाजविचारक प्रवीण बागडे यांनी विद्यार्थ्यांना निश्चित ध्येय ठरवून सातत्याने परिश्रम करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका किरण गायकवाड यांनी केले.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महिपाल मेश्राम, मजदूर महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रभान चकोले तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष पांडुरंगजी शेंडे यांनी पक्षाच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला.
जी.एस. कॉलेज ऑफ कॉमर्सचे सेवानिवृत्त उपप्राचार्य डॉ. अब्दुल कादर मन्सुरी यांनी पालकांचा सन्मान आणि त्यांच्याप्रती असलेल्या कर्तव्यांबाबत आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला महिला विंगच्या राष्ट्रीय प्रभारी सौ. निर्मला सोनेकर, उत्तर नागपूर अध्यक्ष देवेंद्र सोनकुसरे, शहर महासचिव राजेंद्र साहू, शहराध्यक्ष विनील चौरसिया, राजेश तिवारी, वर्धा जिल्हा महिला विंग अध्यक्षा डॉ. अफसाना मन्सुरी, जिल्हा महिला विंग महासचिव परवीन शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान हेल्थ कोच सौ. रूपलता महाजन यांनी अल्पोपहार वितरणाची जबाबदारी पार पाडली. यासाठी सचिन पानतावणे आणि राजेश आगलावे यांनी सहकार्य केले.
समारोपप्रसंगी पक्षाचे वरिष्ठ सल्लागार तसेच जानकी देवी विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक भारतजी पानतावणे यांनी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, पालक आणि सर्व सहभागींचे आभार मानले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि शिक्षणाबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन यामुळे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.