अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय, वसमत येथे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांची भेट

Sat 01-Aug-2026,04:44 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : वसमत येथे आज दिनांक 01ऑगस्ट 2026 रोजी अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय,वसमत येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संचालक महेश पालकर यांनी भेट दिली.या वेळी त्यांच्या समवेत हिंगोली जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी विपुल भागवत,शिक्षणाधिकारी - संदीप सोनटक्के,वसमत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी सतीश काष्टे,शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती जाधव, केंद्रप्रमुख भारती,विद्यालयाचे अध्यक्ष प्रा. बी.डी.कदम,संस्थेचे सहसचिव संदीप कदम,मुख्याध्यापिका .सरिता शिवाजी पतंगे,पर्यवेक्षिका श्रीमती शिंदे शामल,जेष्ठ शिक्षक मिटकर,पठाडे हरी,अशोक जऊळकर, राधाकिशन साबणे,संजय जाधव व कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्य प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

शिक्षण संचालक. महेश पालकर यांनी विविध शैक्षणिक कार्याचे,उपक्रमाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. विद्यार्थिनीशी हितगुज करून मार्गदर्शन केले.