नीट परीक्षा पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
चंद्रपूर : नॅशनल एलिजिबिलिटी कम इंटरन्स टेस्ट अर्थात नीट परीक्षेच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी सोमवारी संबंधित यंत्रणेचा आढावा घेऊन सूचना दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य तथा नीट परीक्षा जिल्हा समन्वयक अनिल घोलपे, शिक्षण अधिकारी कार्यालयाचे येळणे तसेच पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.चंद्रपूर जिल्ह्यात ४ मे २०२५ रोजी १२ परीक्षा केंद्रावर नीट परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा केंद्र असलेल्या सर्व परिसराची तसेच तेथे पुरविण्यात येणाऱ्या सर्व सोयीसुविधांची पाहणी करावी. परीक्षा कालावधीत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी सुरक्षेसह इतर अनुषंगीक बाबींची पुर्तता करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ५ हजार १२४ विद्यार्थी नीटच्या परिक्षेला बसले आहेत.
Related News
सर्वधर्म समाज पार्टीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; शिक्षणाच्या महत्त्वावर विशेष मार्गदर्शन
7 hrs ago | Naved Pathan
सनशाईन ज्युनियर कॉलेजचा १२ वीचा निकाल ९७.४४%; विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश
04-May-2026 | Naved Pathan
इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अल्लीपूरची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
04-May-2026 | Naved Pathan
सक्षम IAS अकॅडमीच्या ५० हून अधिक शिलेदारांची पोलीस दलात झेप; भव्य ‘यशोत्सव’ सोहळा उत्साहात संपन्न
22-Apr-2026 | Sajid Pathan