सोहाळे जिल्हा परिषद शाळेचा आदर्श शाळा पुरस्काराने सन्मान
 
                                    
                                प्रतिनिधी :-अशोक इंगोले( हिंगोली )
सोलापूर :-सोहळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा आदर्श शाळा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.श्री स्वामी समर्थ शासकीय व जिल्हा परिषद शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था सोलापूर यांच्या वतीने सोहळे जिल्हा परिषद शाळेचा आदर्श शाळा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. आज रविवार दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. चेअरमन अंकुश रामचंद्र कुंभार, अनिल बाबासाहेब जगताप यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून सुसंस्कृत असा समाज घडला पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या आधुनिक सोयी-सुविधा शाळेत उपलब्ध करून देऊन शाळेची सकारात्मक वाटचाल सुरू आहे. शाळेच्या माध्यमातून सुसंस्कृत राष्ट्र उभारणीचे महान कार्य करण्यात येत असल्यामुळे आदर्श शाळा पुरस्काराने शाळेचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक गावडे सर, पाटोळे सर, बोबडे सर, डोके सर, वाघमारे सर, कोथिंबीरे मॅडम, चौघुले मॅडम व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य नीवृत्ती जगताप, समीर (बाबा) जगताप, बाबुराव सोनवणे, अलताप मुलाणी उपस्थित होते.
 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
                     
                                                                 
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                            