बोगस शिक्षक भरती घोटाळा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दाबण्याचा प्रयत्न - कैलास बगमारे भाजपा जिल्हा सहसंयोजक

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली:सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये शिक्षण विभागात खूप मोठ्या बोगस शालार्थ आयडी, बोगस शिक्षक भरती, बोगस मुख्यद्यापाक भरती बोगस अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त शाळा या बाबतीत रोज नवीन नवीन खुलासे सादर होत आहेत आणि ह्या प्रकरणी नागपूर विभागात पोलिसांनी आत्ता पर्यंत शिक्षण विभागातील अटक/ताब्यात घेतलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या 16 पर्यंत पोहचली आहे 2012 पासून नागपूर विभागात 1000 शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या त्यापैकी केवळ 350 नियुक्त्या रीतसर प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आल्याचे समोर आले आहे .त्यामुळे शालार्थ आयडी प्रकरणात नियुक्त्या झालेल्या बोगस शिक्षकाच्या नोकऱ्या जाणार हे निश्चित मानल्या जात आहे राज्यात हे सर्व सुरू असताना गडचिरोली येथे कैलास बगमारे जिल्हा सह संयोजक भाजपा पंचायत राज व ग्राम विकास विभाग यांनी मागील महिन्यात श्री साईनाथ अद्दलवार (मुख्याध्यापक महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय आरमोरी) यांची सेवा ज्येष्ठता यादी डावलून मुख्यध्यापक पदी नियुक्ती आणि त्यांनी दिनांक २ मे २०१२ नंतर शिक्षक भरती प्रक्रिया बंद असताना तब्बल 18 शिक्षकाची बेकायदेशीर नियुक्ती त्यांनी अवैध मार्गाने जमा केलेली संपत्ती ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी गडचिरोली जिल्ह्यातील विश्वशाांती विद्यालय कुनघाडा (रै) भेंडाळा तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली या शाळेची बोगस अल्पसंख्यांक दर्जा ची चौकशी अशी तक्रार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना पत्रा द्वारे दिली त्या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी भुसे याना चौकशी चे आदेश दिले यात अल्पसंख्याक ची चोकशी अजून पर्यंत झाली नाही मात्र अद्दलवार प्रकरणी चौकशी केली असता त्यांनी सादर केलेले कागदपत्र खरे की खोटे हे सत्यता न तपासता व तक्रार दाराला कोणतेही कागदपत्र न देता सरळ सरळ यात काहीच सत्यता नाही असा निर्णय देऊन चौकशी अहवाल तक्रार कर्ते यांना देण्यात आला त्यामुळे या प्रकरणी कदाचित पैशाची देवाण घेवाण करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न तर होत नाही आहे ना अशी शंका व्यक्त केली जात आहे त्यामुळे ह्या प्रकरणी आपण शासनाने निर्देशित केलेला विशेष तपास पथक यांच्या कडे आपण तक्रार करणार असल्याचं कैलास बगमारे यांनी सांगितले आहे या संदर्भात एसआयटी प्रमुख सुनिता मेश्राम यांच्या शी चर्चा झाली असून त्यांच्या कडून यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि लवकरच ही चौकशी एसआयटी मार्फत होणार आहे