गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही भर देण्याची गरज - रामदास मसराम आमदार
 
                                    
                                जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी तालुक्यातील भाकरोडी येथील शासकीय आश्रमशाळेत रामदास मसराम यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
आरमोरी - ज्या विश्वासाने पालक शासकीय आश्रमशाळेत मुलांना दाखल करतात त्या विश्वासाला सार्थकी लावण्याची जबाबदारी ही शिक्षक व शाळेवर असते. पालकांच्या मनात आपल्या मुलांप्रती असलेल्या उज्वल भविष्याला साकार करण्यासाठी आश्रम शाळेतील शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी कठोर मेहनत घेतली पाहिजे, तसेच शाळेच्या भौतिक सुविधेत सुधारणा केली पाहिजे असे आमदार रामदास मसराम यांनी केले.आरमोरी तालुक्यातील भाकरोडी येथील शासकीय आश्रमशाळेत आयोजित करण्यात आलेल्या प्रवेशोत्सव व पालक मेळाव्याच्या कार्यक्रमात अध्यक्षिय स्थानावरून बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक लेखा अधिकारी सोमकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम मुख्याध्यापक डोंगरे गणविर सर काँग्रेसचे कार्यकर्ते नरेश टेभुणे पोलिस पाटील लालाजी टेभुणे नानाजी ऊईके मेत्राम सर फुले मैडम अधिक्षक बोरकर अधिक्षक बारसागडे, भास्कर राऊत,लिलेश्वरी निनावे गेडाम व मान्यवर उपस्थित होते.यावेळी आमदार मसराम यांच्या हस्ते बारावीच्या परीक्षेत आश्रम शाळेतुन प्रथम आलेल्या मुलीचा सत्कार करण्यात आले. याप्रसंगी आमदार मसराम यांनी शाळेची पाहणी केली गेवधा येथील एकलव्य शाळेचे विद्यार्थी भाकरोडी शाळेत स्थानांतरीत केल्याने आश्रम शाळेतील २५० विध्यार्थी एकलव्य २६० झाल्याने जवळपास ५१० विध्यार्थीना भौतिक सुविधा पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसल्याची बाब लक्षात आल्याने या समधी आपण विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करणार असे आश्वासन पालकांना दिले.
 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
                     
                                                                 
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                            