नारायण सेवा मित्र परिवाराकडून शीतल जलसेवेचा शुभारंभ
नारायण सेवा मित्र परिवाराकडून शीतल जलसेवेचा शुभारंभ
राहगीरांसाठी जैन ऑप्टिकलजवळ प्याऊ; जनसेवेची स्तुत्य पहल
हिंगणघाट निखिल ठाकरे
नारायण सेवा मित्र परिवाराच्या वतीने मानवसेवेच्या भावनेतून भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणकाच्या पावन निमित्ताने शहर व ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांसाठी शीतल जलसेवा (प्याऊ) सुरू करण्यात आली. या उपक्रमाचा शुभारंभ ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आला.
या शीतल जल प्याऊचे उद्घाटन समाजसेविका श्रीमती किरण मुनोत यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना “जलसेवा हे सर्वश्रेष्ठ दान असून अशा उपक्रमांमुळे समाजाला प्रेरणा मिळते,” असे मत व्यक्त केले. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर “तृष्णा तृप्ती” या उद्देशाने जैन ऑप्टिकलजवळ ही प्याऊ उभारण्यात आली असून, प्रवाशांना सतत थंड व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नारायण सेवा मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल यांच्यासह महेश दीक्षित, लक्ष्मण दहाके, दामोदर चंदनखेडे, शंकर वाकडे, यशवंत गडवार, अरुण पंडित, चंद्रकांत कामडी, पराग मुडे, दुर्गाप्रसाद यादव, प्रा. किरण वैद्य, विपिन खिंवसरा, अॅड. विशाल जैन, रामदास खडगी, गोपाल वर्मा, सुभाष लालवानी, महिंद्र मुनोत, संजय लालवानी, अमोल भुतडा, विजय मुथा, निलेश भुतडा, किरण अग्रवाल, वीरश्री मुडे, रश्मी घायवटकर, नंदिनी जवादे, शुभांगी वैद्य, कंचन खिंवसरा, स्वाती मुथा, कविता खिंवसरा, अनुराधा मोटवानी, भाग्यश्री खियानी, शीतल भुतडा यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.