गहाळ झालेल्या दोन मोबाईलचा सेलू पोलिसांनी लावला शोध; ४२ हजारांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत

Mon 15-Jun-2026,05:42 AM IST -07:00
Beach Activities

गहाळ झालेल्या दोन मोबाईलचा सेलू पोलिसांनी लावला शोध; ४२ हजारांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत

सेलू (प्रतिनिधी) : युसूफ पठाण

सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीत गहाळ झालेल्या दोन मोबाईल फोनचा यशस्वी शोध लावत सेलू पोलिसांनी ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तक्रारदारांना परत केला.

तक्रारदार योगेश मुडे, रा. सेलू यांचा वनप्लस कंपनीचा सुमारे १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल तसेच भूषण करनाके, रा. सेलू यांचा नथिंग कंपनीचा सुमारे २७ हजार रुपये किमतीचा मोबाईल गहाळ झाला होता. याबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेत सेलू पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करून दोन्ही मोबाईल शोधून काढले.

शोधण्यात आलेले एकूण ४२ हजार रुपये किमतीचे मोबाईल संबंधित तक्रारदारांच्या ताब्यात देण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी सेलू पोलिसांचे आभार मानले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे तथा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या पर्यवेक्षणात करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, पोलीस अंमलदार गणेश राऊत आणि ज्ञानदेव वनवे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.