सनशाईन ज्युनियर कॉलेजचा १२ वीचा निकाल ९७.४४%; विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश
सनशाईन ज्युनियर कॉलेजचा १२ वीचा निकाल ९७.४४%; विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
सेवाग्राम | २ मे २०२६ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी (HSC) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, सेवाग्राम येथील सनशाईन ज्युनियर कॉलेजने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यंदा महाविद्यालयाचा एकूण निकाल ९७.४४ टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी उज्ज्वल कामगिरी करत यशाचा नवा उच्चांक गाठला आहे.
या निकालात अनेक विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. महाविद्यालयाच्या या उल्लेखनीय यशामुळे सेवाग्राम परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांची यादी (HSC 2026):
१) अथर्व पाटील – ८८.००%
२) ओजस धावड – ८७.८३%
३) भार्गवी जानवे – ८४.८३%
४) साक्षी सावरकर – ८२.६७%
५) तन्मय लाटे – ८२.००%
६) मुक्ता तडास – ८०.१७%
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा तबस्सुम आझमी, सचिव आय. आर. आझमी तसेच कॉलेजचे संचालक आदिल आझमी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. “विद्यार्थ्यांची जिद्द, परिश्रम आणि शिक्षकांचे सक्षम मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले,” असे मत संचालक आदिल आझमी यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या यशात नितेश बोंडे, कल्पना कोंबे, ऋतुजा माटे, शुभांगी साखरकर, रशिका वाघमारे, आदित्य पेटकर, योगिता पाटील, जीवन अवधारे आणि संदीप ठाकूर या शिक्षकवृंदाचे मोलाचे योगदान लाभले.
महाविद्यालयाच्या या यशस्वी कामगिरीमुळे परिसरात संस्थेचे कौतुक होत आहे.