आपल्या यशाचा उपयोग समाजासाठी करावे : खासदार अमर काळे

Mon 17-Aug-2026,10:03 PM IST -07:00
Beach Activities

आपल्या यशाचा उपयोग समाजासाठी करावे : खासदार अमर काळे 

डॉ पलाश मोहन गौरशेट्टीवार यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

नावेद पठाण मुख्य संपादक, वर्धा 

वर्धा :- गुण-गौरव सोहळा हा केवळ एक व्यक्तीच्या यशाचा सत्कार नसतो; तर त्या व्यक्तीच्या यशामागे असलेल्या कुटुंबाचा, संस्कारांचा, शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा, सहकान्यांच्या सहकार्याचा आणि समाजाच्या शुभेच्छांचा तो गौरव असतो.

मला नोकरी हवी आहे याऐवजी मला ज्ञान हवे आहे कौशल्य हवे आहे आणि माझ्यासोबत इतरांसाठीही रोजगार निर्माण करायचा आहे, अशी तरुण पिढी निर्माण झाली, तर भारताला विकसित राष्ट्र बनण्यापासून कोणीही रोखु शकणार नाही कष्ट करा, ज्ञान मिळवा, संशोधन, नवनिर्मिती करा आणि आपल्या यशाचा उपयोग समाजासाठी करा असे मौलीक विचार वर्धेचे खासदार अमर काळे यांनी व्यक्त केले.

ते १६ ऑगस्ट रोजी ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरम, विश्व सिंधी सेवा संगम, स्नेहालय संख्या तथा सत्याश्रम मंडळ वर्धा व्दारा होटल वृंदावन सभागृहात आयोजित डॉ पलाश मोहन गौरशेट्टीवार यांच्चा गुणगौरव सोहळया प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्धा नगर परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुधिर पांगुळ तर प्रमुख अथिती म्हणून चेतना डी.एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलींद सवई, ज्येष्ठ पत्रकार रविन्द्र चांदेकर, सेंट थॉमस जुनियर कॉलेजच्या प्राचार्य डॉ. प्रिती विजय सत्यम, ज्येष्ठ साहित्यकार डॉ. शांतीलाल कोचर गोल्डी, प्राचार्य डॉ. विद्या कळसाईत प्रा. डॉ अनिस बेग, नवीन आहुजा, मोहन गौरशेट्टीवार ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही. राष्ट्रीय सचिव किरण फुलझेले, माजी प्रदेशअध्यक्ष विजय नाखले आदी मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

एखादी व्यक्ती ज्ञान मिळवून ते समाजाला परत देते, विद्यार्थीना घडवते, संशोधन करते आणि पुढच्या पिढीला दिशा देते, तेव्हा त्या यशाला खऱ्या अर्थाने सामाजिक मुल्य प्राप्त होते अशी भावना रविन्द्र चांदेकर यांनी व्यक्त केली. डॉ. पलाश गौरशेट्टीवार यांचे यश विशेष महत्वाचे ठरते कारण त्यांनी केवळ पि.एच.डी. पद्वी मिळिवलेली नाही, तर त्यांनी शिक्षण, संशोधन प्रशासन, व नवोन्मेष आणि विद्याथ्यांच्या कौशल्यविकासाचा एक सुंदर संगम घडवून आणला आहे असे मत इमरान राही यांनी व्यक्त केले डॉ पलाश यांचा यशाचा अभिमान त्यांच्या आई- वडिलांना कुटुंबाना जितका आहे, तितकाच तो संपूर्ण वर्धा शहराला आहे असे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ. सुधिर पांगुळ यांनी व्यक्त केले. या प्रसंगी डॉ. मिलिद सवाई, विद्या कळसाईत, डॉ, प्रिती सत्यम, डॉ. शांतीलाल कोचर यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले

कार्यक्रमाची प्रस्तावना विलास कुळकर्णी दिलखुलास संचालन अँड इब्राहिम बख्श आज़ाद तर आभार भगवानदास आहुजा यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाला, डॉ. के. टी. वी रेड्डी, डॉ. राजेन्द्र रेवतकर, डॉ. स्वप्नील गुंडावार, डॉ प्रविण कुमार, डॉ पंकज अनावाळे, डॉ. उत्कष पाचारणय, डॉ. गौख मिश्रा, डॉ अनुराग लुहारीया, विजय उर्फ गुड्डू शर्मा, माजी उपाध्यक्ष, नगर पालिका, हींगणघाट, जयंत येरावार, मनिष गंगवार, पंकज मानलवार, राजेश नरशेट्टीवार, सतीश चिड्डेवार, संजय दुदलवार, प्रविण पेठे, शशांक चतारे, संतोष देशमुख, संजय बोंडे, मुन्ना शुक्ला, प्रा. राजु बाणमारे, जमिर शेख, सुहास घणोकर, राजु लभाणे, जितु गोरडे, संतोष तुरक, गणेश शेंडे, आदी अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.