बल्लारपुर तहसील कार्यालयासह नगर परिषदेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

Sun 16-Aug-2026,10:52 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर:भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन बल्लारपूर शहरात उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय, नगर परिषद तसेच ऐतिहासिक किल्ल्यावर विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी ९.०५ वाजता उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलिस विभाग आणि होमगार्डच्या जवानांनी ध्वजाला मानवंदना दिली.

तहसीलदार रेणुका कोकाटे, नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले, अजय मल्लेलवार, विनोद निखाते यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचारी, मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.

तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य आणि माजी सैनिकांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्षा अल्का वाढई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी विशाल वाघ, उपमुख्याधिकारी रविंद्र भांडारवार, संगीता उमरे, कार्यालयीन अधीक्षक नंदकिशोर सातपुते, साठा विभाग प्रमुख उपेंद्र धामनगे, लेखापाल अनिर्बन चक्रवर्ती, नगर परिषद उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, गटनेते अब्दुल करीम, ॲड. मेघा भाले, नगरसेवक लखन सिंह चंदेल, गोलू डोहने यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. शहरातील प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर आणि पत्रकारांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.

दरम्यान, बल्लारपूरच्या ऐतिहासिक किल्ल्यावर नगर परिषद उपाध्यक्ष देवेंद्र आर्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील विविध ठिकाणी देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.