सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना ‘संजीवनी’?

Wed 19-Aug-2026,12:32 AM IST -07:00
Beach Activities

सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना ‘संजीवनी’?

सालोड हिरापूरमध्ये पार्सल दारूची जोरदार चर्चा दुचाकीवरून ग्राहकांपर्यंत पार्सल?

नावेद पठाण मुख्य संपादक, वर्धा

वर्धा वर्धा, सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही गावांमध्ये अवैध धंद्यांनी पुन्हा डोके वर काढल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अवैध दारू, सट्टा आणि जुगार यांसारख्या प्रकारांवर पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे

विशेषतः सालोड हिरापूर परिसरात पार्सल दारूची सुविधा जोमात सुरू असल्याची चर्चा असून, काही युवक दुचाकीवरून अवैध दारूची ने-आण करून ग्राहकांपर्यंत दारू पोहोचवत असल्याचे आरोप केले जात आहेत.

त्यामुळे परिसरात' दारू’ची चर्चा चांगलीच रंगली आहे

दारू ग्राहकांपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी दुचाकींचा वापर होत असल्याचे बोलले जात असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. 

ग्राहकांपर्यंत दारू पोहोचविण्याची ही सुविधा नेमकी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे

अवैध दारूसोबत सट्टा-जुगाराचीही चर्चा

अवैध दारूविक्रीसोबतच सट्टा-जुगाराचे अड्डे सक्रिय असल्याचीही जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे. 

विशेषतः पोळा सण जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जुगाराचे प्रकार वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून आतापासूनच विशेष गस्त आणि तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे

कारवाईचा धाक कुठे गेला?

अवैध धंद्यांबाबत चर्चा सुरू असताना संबंधित ठिकाणी ठोस कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत

अवैध दारू, सट्टा आणि जुगाराला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई होणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे

सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये अवैध धंद्यांची सखोल तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे

अवैध धंद्यांना कोणाचे पाठबळ?’आणि ‘पोलीस प्रशासनाचे लक्ष नेमके कुठे?* असे प्रश्न सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहेत

चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे