24 ऑगस्ट 2026 रोजी तहकूब झालेली ग्रामसभा यशस्वी झाल्याचा बनाव
प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत येथील मोजे कुडाळा येथील 24 ऑगस्ट 2026 रोजी तहकूब झालेली ग्रामसभा यशस्वी झाल्याचा बनाव करत. सरपंचाच्या सांगण्यावरून यांनी ग्रामपंचायत सेवकांच्या वडिलांच्या मदतीने गावातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन दिशाभूल व फसवणूक केल्याची गटविकास अधिकारी पंचायत समिती वसमत यांच्याकडे कुडाळा ग्रामस्थांची तक्रार.
ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. सदर ग्रामसभेची नोटीस ग्रामपंचायत अधिकारी मठपती यांनी दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी स्वतः ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रथम दर्शनी भागात लावली होती,मात्र, ग्रामसभा आयोजित करण्याची नोटीस स्वतः काढूनही दिनांक 24 ऑगस्ट रोजी गग्रामपंचायत अधिकारी ग्रामसभेस उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ग्रामसभेच्या कामकाजाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने गावातील सर्व सुजाण नागरिकांनी सदर ग्रामसभेवर बहिष्कार टाकत ग्रामसभा तहकूब करण्यात आली व तसे ग्रामपंचायत कार्यालयात जाहीर करण्यात आले,परंतु दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी सरपंच संभाजी चव्हाण यांच्या सांगण्यावरून ग्रामपंचायतच्या सेवकाचे वडील सोपान बनसोडे हे ग्रामस्थांच्या सह्या घेण्यासाठी उपस्थिती रजिस्टर घेऊन घरोघरी फिरत नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेत असल्याचे दिसून आले,नियोजित तारखेला ग्रामसभा प्रत्यक्षात पार पडली नाही, ग्रामसभेवर ग्रामस्थांनी बहीस्कार टाकला तरी दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांच्या सह्या घेऊन ग्रामसभेची उपस्थिती दाखविण्याचा प्रयत्न गावातील सरपंच यांनी करण्याच्या प्रयत्न केला असून
याचे सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे उपलब्ध आहेत, वरील प्रकण अत्यंत गंभीर असून शासनाची दिशाभूल व फसवणूक केली जात आहे.
त्यामुळे या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी कार्यवाही होणे अपेक्षित आहे,आपण या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून, दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजीच्या ग्रामसभेचे प्रत्यक्ष कामकाज, उपस्थिती रजिस्टर, कार्यवाही रजिस्टर, नोटीस तसेच दिनांक 25 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या सह्यांची सत्यता तपासावी,त्यामुळे ग्रामसभेचे कामकाज पारदर्शक व नियमानुसार होणे हा ग्रामस्थांचा हक्क आहे, परंतु त्यांच्या हक्कांवर गदा आणण्याचं ग्रामपंचायत सरपंच इतर लोकांना हाताशी धरून दिशाभूल व फसवणूक करत आहेत हा कुडाळा वासियांचा स्पष्ट आरोप असल्यामुळे तक्रारीची गांभीर्य दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची गटविकास अधिकाऱ्याकडे करण्यात आली निवेदनावर बालाजी चव्हाण, बद्री चव्हाण,रानोजी भुजबळे, राजरत्न भुजबळे,विठ्ठल चव्हाण छगन भुजबळे, सटवाजी भुजबळे, गोविंद बनसोडे, अनिकेत ढवळे माणिक ढवळे, विष्णू पांचाळ, विठ्ठल बनसोडे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.