राष्ट्रवादी काँग्रेस हिंगोली जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करणार- शशिकांत शिंदे
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे हे आज दिनांक १६ जूलै २०२६ गुरुवार रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते त्यांनी राष्ट्रवादी भवन,हिंगोली येथे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची संघटनात्मक आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन तळागाळापर्यंत नेऊन जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याला हिंगोली जिल्हाध्यक्ष पदाची जिम्मेदारी दिली जाईल आणि भविष्यात २०२९ साली राष्ट्रवादीचे खासदार आमदार ताकदीने निवडून आणणार"
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी सहकार मंत्री *मा.जयप्रकाश दांडेगावकर*, माजी आमदार सुनील भुसारा, माजी आमदार विजयराव गव्हाणे, प्रदेश सरचिटणीस डॉ.भीमराव हत्तीअंभीरे, जिल्हा निरीक्षक पंकज बोराडे, अमित खडसे यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष ॲड.रवि शिंदे, विधानसभा अध्यक्ष बंडू मुटकुळे,गणेशराव गडदे,माजी जि.प.उपाध्यक्ष मनीष आखरे,माधव कोरडे,युवक जिल्हाध्यक्ष सोनू चव्हाण,विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष व्यंकटेश जोगदंड,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष आयुब पठाण,अनुसूचित जाती आघाडी जिल्हाध्यक्ष भास्कर कुरे,तालुकाध्यक्ष डॉ.संतोष बोंढारे,धीरज काकडे,गजानन गव्हाणे,शहराध्यक्ष मुजीब पठाण मोईन बागवान,दिलीपराव राखोंडे,सिराज कुरेशी,आनंदराव कदम,अभिजीत देशमुख,डॉ.वेदांत मरळे,प्रा.गजानन थोरात,युवक तालुकाध्यक्ष सुशील बोंढारे,रमेश जाधव,राजू बाभळे, विनायक माखणे ,सुनील मस्के,गणेशराव लेकुळे,प्रभू शिंदे,प्रफुल पाईकराव, उत्तम पोटे,लक्ष्मण पोटे, सुभाष सरडे,सुभाष सापनार, प्रदीप बरडे, मुंजाजी बर्गे,गणपत चिरमाडे, देविदास शेंबडे,अनोज वायकोळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.