वसमत येथील सय्यद इमरान अली नासर अली यांना मराठवाडा आयकॉन सन्मान प्रदान करण्यात आला.
 
                                    
                                प्रतिनिधी:- अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत देशभरातील विश्वसनीय प्रसारमाध्यम असलेल्या नवभारत प्रेस लिमिटेड कडून सामाजिक, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वसमत येथील सय्यद इमरान अली यांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते आज मराठवाडा आयकॉन सन्मान प्रदान करण्यात आला आहे नवभारत प्रेस लिमिटेड च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा क्षेत्रात जनजागृती सह राज्यभरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्य व विभागीय पातळीवर पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे सन 2025 साठी मराठवाडा विभागातून सामाजिक, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महा ऊर्जाचे अध्यक्ष सय्यद इमरानअली नासरअली यांना मराठवाडा आयकॉन सन्मान जाहीर झाला असून आज दिनांक 20 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल रामा इंटरनॅशनल जालना रोड छत्रपती संभाजीनगर येथे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, जालण्याचे खासदार कल्याण काळे, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर सह मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे सय्यद इमरान अली आमदार राजू भैया नवघरे सेवा प्रतिष्ठाणाचे सदस्य असून सय्यद इमरान अली वेल्फेयर फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत त्यांनी दोन सामुदायिक विवाह सोहळ्यात तब्बल 60 जोडप्यांचे विवाह कार्य केले आहे शिवाय आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना आरोग्य सेवा पुरवत आहेत त्यांच्या या सन्मानाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
                     
                                                                 
                                                            