भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात वर्धा जिल्हा काँग्रेसचा तीव्र निषेध

Thu 08-Jan-2026,10:45 PM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

वर्धा:वर्धा लातूर महानगरपालिका निवडणूक प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्याबाबत अवमानकारक आणि बेताल वक्तव्य केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. या वक्तव्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मागील दहा ते बारा वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजप सरकारमधील काही केंद्रीय व राज्यस्तरीय नेते, आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्यात सत्तेचा गर्व सातत्याने दिसून येतो. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्यातून आला असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज गुरुवारी (दि. ८ जानेवारी २०२६) दुपारी ४ वाजता सिव्हिल लाईन्स येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी रविंद्र चव्हाण यांच्या प्रतिमेला चपला व जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला. हे आंदोलन जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

या निषेध आंदोलनात अभुदय मेघे, सुधीर पांगुळ, सुनील कोल्हे, अविनाश इंदुरकर, नरेंद्र मसराम, अशोक चौधरी, चंद्रकांत लाखे, बाळा जगताप, नंदकुमार कांबळे, सागर सबाने, पंकज काचोळे, प्रमोद वरघट, संदीप शिंदे, नंदकुमार वानखेडे, अक्रम पठाण, अविनाश उबाळे, विजय नरांजे, ऋतुजा भोयर, शैला दीक्षित, अश्विनी खोडे, हेमंत खोडे, अविनाश काकडे, मेहमूद शेख, नाझिया शेख, बाबाराव पाटील, मिलिंद मोहोड, अर्चना सोमवंशी, सुनील सोमवंशी, धर्मपाल ताकसांडे, धरम विदेशी शेंडे, अंकुश मुंजेवार, देवाशिष कोटबंकर, मनोजकुमार देशमुख, विलास कोरले, शेखर गजभिये, अभिजीत चौधरी, चंदू सुटे, वैभव सूर्यवंशी, धनंजय देशमुख, अर्चना भोमले, राजीव वानखेडे, नदीम (रिंकू), परवेज खान, मयुरेश देशमुख, विवेक तळवेकर, मनीष गंगमवार, बाळा माऊसकर यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेसप्रेमी उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाने यावेळी भाजप नेत्यांच्या अशा वक्तव्यांचा तीव्र शब्दांत निषेध करत, भविष्यातही अशा प्रकारची अवमानकारक भाषा वापरल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला.