कर्तव्यनिष्ठ पोलिस सेवकांना भावभीनी निरोप पोलीस अधीक्षक कार्यालय,वर्धा येथे सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव

Fri 09-Jan-2026,09:39 AM IST -07:00
Beach Activities

वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी युसुफ पठाण

वर्धा वर्धा पोलीस विभागात अनेक वर्षे निष्ठा, समर्पण व कर्तव्यभावनेने सेवा बजावल्यानंतर वयोमर्यादा पूर्ण करून सेवानिवृत्त झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे भव्य व भावनिक निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी पोलिस उपअधीक्षक (गृह) श्री. पुंडलिक भटकर यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

समारंभात मार्गदर्शन करताना भटकर म्हणाले,

“पोलीस सेवा ही अत्यंत आव्हानात्मक असते. कुटुंबीय जबाबदाऱ्या सांभाळत कर्तव्याशी प्रामाणिक राहून तुम्ही दिलेली सेवा प्रेरणादायी आहे. तुमचे योगदान हे पोलीस विभागाची अमूल्य ठेव आहे.”

यावेळी त्यांनी सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी :

स.फौ./583 विलास येनुरकर – वाहतूक शाखा, वर्धा (दि. 30.11.2025)

स.फौ./1181 संजय चाटे – वाहतूक शाखा, वर्धा (दि. 30.11.2025)

श्रेणी पो.उपनि./666 श्रीकृष्ण हिवराळे – पोलीस मुख्यालय, वर्धा (दि. 31.12.2025)

स.फौ./238 विनोद भांडे – वाहतूक शाखा, हिंगणघाट (दि. 31.12.2025)

श्रेणी पो.उपनि./344 गौरीशंकर जागेश्वर – पुलगाव (दि. 31.12.2025)

समारंभाचा संक्षिप्त आढावा :

या निरोप समारंभास पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव व आठवणी मनोगताद्वारे व्यक्त केल्या. संपूर्ण कार्यक्रम अतिशय सौहार्दपूर्ण, प्रेरणादायी व आपुलकीच्या वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सायबर सेलचे सहायक निरीक्षक श्री. आशीष चिलांगे यांनी केले.