मोठ्या आवाजाचे अवैध बनावट सायलेंसर वर्धा वाहतूक पोलिसांनी नाश केलेत

Thu 08-Jan-2026,11:00 PM IST -07:00
Beach Activities

वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधि यूसुफ पठान

वर्धा:वर्धा आज दि. 08/01/26 रोजी रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने मा पोलीस अधिक्षक श्री सौरभ अग्रवाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखा पोलीस वर्धा यांनी मोटार वाहन कायदा कलम 190(2)194फक्त, 198 अन्वये जे सायलेंसर बनावट आहे मोठ्या आवाजचे आहेत जे अनाधकृतपणे बसविन्यात आलेले होते ज्यांचा आवाज 80 डेसिबल पेक्षा जास्त होते ज्यांच्या मोठा आवाजने इतर चालक व नागरिकांना त्रास होत होता ते 150 सायलेंसर हे वाहतूक पोलिसांनी मोटार वाहन कायदा अंतर्गत जप्त केलेले होते ते सायलेंसर आज मा कोर्टाचे आदेशानवये पंचासमक्ष रोलर खाली दाब देवून नाश केलेत, सदर कार्यवाही वाहतूक शाखा वर्धा चे पोलीस निरीक्षक विलास पाटील पो उप नि अमोल लगड, ASI मंगेश येळणे, संजय भांडेकर, रियाज खान, दिलीप आंबटकर, प्रशांत करंजेकर. पो. हवा, आशिष देशमुख, किशोर पाटील मुकेश राऊत, प्रदीप कोहळे यांनी आज रोजी 12/00 वा बजाज चौकात ही कार्यवाही केली.

सर्व वाहन चालक यांना आवाहांन आहे कि बिना परवाना सायंलेन्सर बदल करू नये. मोठ्या आवाजचे सायलेंसर वापरू नये, फटाके फोडू नये अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी 

विलास पाटील पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा वर्धा.