QR Coding, प्रत्येक रोप व वृक्ष ओळख जि प उच्च प्राथमिक शाळा काचनगांवचा नावीन्यपूर्ण उपक्रम
तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लिपूर
विद्यार्थी, पालक व शाळेत येणाऱ्या पाहुण्यांना प्रत्येक रोपटे व वृक्ष यांच्या विषयी सविस्तर माहिती व्हावी. त्यांचे विविध भाषेतील नावे, शास्त्रीय नाव व त्याचा उपयोग कळावा. या करिता जि प उच्च प्राथमिक शाळा काचनगांव,केंद्र कुटकी, ता हिंगणघाट, जि वर्धा येथे प्रत्येक रोप व वृक्षाला Q R Coding केले आहे.
शाळा म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञानाचे मंदिर नव्हे, तर सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे.
जिथे मुलांचे व्यक्तिमत्व घडते, त्यांना नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यांचे भविष्य घडवले जाते.
शाळेत आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञान मिळत नाही, तर जीवनातील अनेक महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात. खेळ, कला, संगीत आणि इतर अनेक उपक्रमांमुळे मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. त्यांना एकत्र काम करायला, एकमेकांना मदत करायला आणि आपले विचार मांडायला शिकवले जाते.
आजकालच्या धावपळीच्या जीवनात मुलांना सर्व झाडांची, पालेभाज्याची माहिती सहज मिळावी याकरिता सर्व झाडांचे स्कॅनर तयार करून त्यात सर्व प्रकारची उपयोगी माहिती टाकण्यात आली व झाडांना लावन्यात आले. यामुळे भविष्यात त्यांना सर्व गोष्टीचे सहज ज्ञान मिळेल या सुंदर उपक्रमाची सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे