जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा काचनगाव येथे राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह साजरा

Thu 15-Jan-2026,11:17 PM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लिपूर

दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा काचनगाव येथे राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह अंतर्गत प्रमोद धोटे PSI व संदिपज झिले हेड कॉन्स्टेबल राजमार्ग पोलीस यांनी वाहतुकीचे नियम, हेल्मेट सक्ती,रस्त्यावर पायदळ चालताना घ्यावयाची काळजी तसेच वाहतूक करतांना कोणती काळजी घ्यावी या विषयी सखोल असे मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमा प्रसंगी केंद्रप्रमुख राखुंडे साहेब , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतिश कापसे , मुख्याध्यापक कुरटकर सर, मोघे सर ,काकडे सर ,धुर्वे सर , मांढरे सर तसेच सर्व विद्यार्थी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..