मॉडेल हायस्कूलमध्ये शालेयस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन
नावेद पठाण मुख्य संपादक
कारंजा (घा.) विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासास चालना देण्यासाठी व अवांतर वाचनाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने येथील मॉडेल हायस्कूलमध्ये शालेयस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत इयत्ता ५ वी ते १० वीच्या सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धा प्राथमिक (५ वी ते ७ वी) व माध्यमिक (८ वी ते १० वी) अशा दोन गटांत घेण्यात आली. ही स्पर्धा ५० गुणांची होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापासून ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीपर्यंत तोंडी प्रश्नमंजुषा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यानंतर अंतिम सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, विज्ञान व क्रीडा विषयांवरील प्रश्नांचा समावेश होता.
इयत्ता ५ वी ते ७ वी गटात कु. टिना तारकेश्वर पवार हिने प्रथम, कु. लोचना दिनेश चरडे हिने द्वितीय, तर कु. मोहिनी चोपडे, कु. गायत्री घागरे, कु. मनस्वी पठाडे, कु. पलक बनगरे व कु. खुशबू बोबडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
इयत्ता ८ वी ते १० वी गटात कु. श्रावणी प्रवीण भांगे हिने प्रथम, कु. नेहा किरणाके व वैभव खवशी यांनी द्वितीय, तर संगम बारंगे यांच्यासह इतर विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना कारंजा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी विणा धावडे यांच्या हस्ते बक्षिसे व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख भुजाडे,रमधम तसेच मुख्याध्यापक विनोद कहारे उपस्थित होते.